India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्याच्या या भागात ‘हिवसाळा’! हवामान विभागाकडून पावसाचा इशारा

India Darpan by India Darpan
January 22, 2023
in मुख्य बातमी
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वातावरणात झपाट्याने बदल होतो आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा आरोग्यावर परिणाम होतो आहे. शेती पिकांना देखील फटका बसतो आहे. अशातच हवामान विभागाकडून २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस येणार असल्याने त्रास अधिकच जाणवण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यभरात थंडीचा अनुभव येतो आहे. पण, त्यात सातत्याने फेरबदल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत आहे. यामुळे वाहने चालवताना अडचणी निर्माण होत आहेत. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते आहे. शेतकरी चिंतेत आहेत. अशातच आता हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण या पावसाचा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच पिकांवर वाढत्या थंडीचा परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस पडला तर पिकांचं मोठं नुकसान होण्यची शक्यता आहे.

थंडी ओसरण्याची चिन्हे
गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात थंडीची लाट पसरली आहे. विशेषत: उत्तर भारतात थंडीचा जोर अधिक आहे. थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. या कठीण स्थितीत उत्तर भारतीयांसाठी दिलासा देणारी बातमी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यादरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे २३ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान उत्तर भारतात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली या राज्यांमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Rainfall Forecast for 4 weeks:
WD associated precipitation over N India &adj region central India expected in wk 1 & 2.
RF activity will cont ovr BoB & adj S Peninsula in wk 2 & 3.
📢 27Jan – 2Feb राज्यात #मराठवाडा,#विदर्भ व परीसरात हलका-मध्यम पावसाची शक्यता, ढगाळ वातावरण.

– IMD pic.twitter.com/wQAIqhRhKp

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 21, 2023

Alert IMD Rainfall Winter Climate Forecast


Previous Post

नाशकातील खेळाडूंना नामी संधी! येथे अर्ज करा आणि मिळवा थेट १ लाखांची स्कॉलरशीप

Next Post

राजधानी दिल्लीत ‘राष्ट्रीय मराठी मोर्चा’ची स्थापना; भाजप नेते आनंद रेखी राष्ट्रीय अध्यक्षपदी, अभिनेते सचिन खेडेकर यांचेही समर्थन

Next Post

राजधानी दिल्लीत 'राष्ट्रीय मराठी मोर्चा'ची स्थापना; भाजप नेते आनंद रेखी राष्ट्रीय अध्यक्षपदी, अभिनेते सचिन खेडेकर यांचेही समर्थन

ताज्या बातम्या

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023

ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करण्यासाठी लाच; पोलिस अंमलदार व होमागार्ड एसीबीच्या जाळ्यात

January 28, 2023

मोदी सरकारचा मोठा निर्णय! राष्ट्रपती भवनातील या ऐतिहासिक गार्डनचे नाव बदलले

January 28, 2023

अतिशय गरीब घरातील या महिलेचा आवाज ऐका, तुम्हीही थक्क व्हाल! अभिनेता सोनू सूदने दिली ही मोठी ऑफर (व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group