नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील बळी मंदिर चौकात दुचाकीवर डबलसिट प्रवास करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सुरेखा शरद कोठावदे (रा. पार्कसाईड होम, बळी मंदिर, आडगाव शिवार) असे मृत महिलेचे नाव आहे. दुचाकीवरून रस्तावर पडल्याने महिलेच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोठावदे या रविवारी (दि.१४) रात्री आपल्या पतीसमवेत दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कोठावदे दाम्पत्य बळी मंदिर चौकातून आपल्या घरी जाण्यासाठी पार्क साईडच्या दिशेने डबलसिट प्रवास करीत असतांना महामार्गाने धावणा-या अज्ञात चारचाकीने दुचाकीस हुलकावणी दिली.
या अपघातात दाम्पत्य रस्त्यावर पडले होते. त्यातील सुरेखा कोठवदे यांना गंभीर दुखापत झाली. तर, पती शरद कोठावदे यांना किरकोळ दुखापत झाली. पती शरद कोठावदे यांनी तत्काळ पत्नी सुरेखा यांना नजिकच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी सुरेखा यांना मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.