नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात रस्ते अपघातांची मालिका सुरूच आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात झालेल्या तीन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही अपघात दुचाकीचेच आहेत.
आडगाव
आडगावला सर्व्हिस रोडवर लोकमान्य हॉस्पीटल जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गेल्या मंगळवारी (दि.१) रात्री पावने दहाच्या सुमारास रानोबा हिरामण कुवर (वय ३८, विश्वकर्मानगर, आडगाव) हे त्यांच्या दुचाकीवरुनसव्हिस रोडने जात असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञता वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचारसुरु असतांना शनिवारी (दि.५) डॉ. राम पाटील यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
गांधीनगर
पुणे रोडवर गांधीनगर परिसरात रिफ्लेक्टरवर ॲक्टीव्हा दुचाकी आदळून एकाचा मृत्यु झाला. दिवाकर अनंतराव
आल्हाट (वय ५५, कारमॉल मागे पार्थर्डी पाटा) असे अपघातात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी मृत दिवाकर आल्हाट शुक्रवारी (दि.४) रात्री पावने अकराच्या सुमारास महामार्गावरुन गांधीनगर विमातळाच्या गेटजवळून त्यांच्या दुचाकी (एमएच १५ एफएस ५६७६) हिच्यावरुन जात असतांना तेथील चिंचेच्या
झाडापासून काही अंतरावर असलेल्या रिप्लेक्टरवर त्यांची दुचाकी आदळून गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. राम पाटील यांनी मृत घोषीत केले. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
लहवित
देवळाली कॅम्प परिसरातीस लहवित शिवारात दुचाकी घसरुन एकाचा मृत्यु झाला. किशोर दत्तू गायकवाड (वय २९, लहिवत दे.कॅम्प) असे अपघातात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. ३१ जानेवारीला मृत किशोर गायकवाड हे त्यांच्या दुचकीवरुन जात असतांना लहवित गावाजवळ दुचाकी स्लीप होउन ते जखमी झाले त्यांना ३१ जानेवारीला रेडियंट आणि त्यानंतर व्होक्हार्ट रुग्णालयात दाखल केले असता डॉ. बोरसे यांनी मृत घोषीत केले. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.