नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घर खरेदी केल्यानंतर त्याच्या नोंदणीसाठी आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही. कारण, बिल्डरच्या कार्यालयातच दस्त नोदणी होणार आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी, नरेडको नाशिक सभासद व नाशिक शहरातील बँक प्रतिनिधी यांची ई- रजिस्ट्रेशन सुविधेबाबत एकत्रित बैठक झाली. बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात होणार ई- रजिस्ट्रेशन दस्त नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुद्रांक जिल्हाधिकारी, नरेडको नाशिक सभासद व नाशिक शहरातील बँक प्रतिनिधी यांची ई- रजिस्ट्रेशन सुविधेबाबत एकत्रित बैठक झाली. राज्य शासनाच्या मुद्रांक व स्टॅम्प विभागाने केलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त बांधकाम व्यवसायिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक यांनी केले. बांधकाम व्यावसायिकांच्या विविध करारनाम्यासाठी मुद्रांक कार्यालयात जावे लागते, बहुतेक ठिकाणी गर्दी व इतर तांत्रिक अडचणी भेडसावत असतात. नरेडको नाशिक व बँक प्रतिनिधी यांनी सर्व माहितीचे तपशील समजावून घेत येत्या २-३ दिवसात ऑनलाईन प्रोजेक्ट नोंदणी व दस्त नोंदणी करण्याचे आश्वासन नरेडको नाशिक या संघटनेने दिलेले आहे.
प्राथमिक स्वरूपात यामध्ये १० बांधकाम व्यवसायिक सहभागी होणार आहेत. सदर बैठकीत नरेडको नाशिक अध्यक्ष अभय तातेड मानद सचिव सुनील गवादे , जयेश ठक्कर शंतनू देशपांडे, भाविक ठक्कर, शशांक देशपांडे, एचडीएफसी चे समीर दातरंगे, प्रसन्न पाटील, स्टेट बँक ऑफ इंडिया चे नेगी साहेब, युनिअन बँकचे प्रमोद भगत, आयसीआय बँकचे जयंत पाटील, राहुल कुलकर्णी, एलआयसीचे महेंद्र जोशी हजर होते. नरेडको नाशिक व बँक प्रतिनिधी यांनी संपूर्णपणे या योजनेत सहभागी होण्याचे आश्वासित केले.
Nashik City Property Registration Builder Office