India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आरडी सर्कलवरील चोर्‍यांचा शोध घ्या; आरडी मायनिंग कंपनीचे पोलिसांना पत्र

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in स्थानिक बातम्या
0
प्राातिनिधिक फोटो

प्राातिनिधिक फोटो


 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कर्मयोगीनगर येथील आरडी सर्कल आणि तेथील काम सुरू असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरील बांधकाम साहित्याची वारंवार चोरी होत आहे. या प्रकारांना त्वरित आळा घालावा, असे पत्र आर. डी. मायनिंग इक्वीपमेंट कंपनीचे संचालक राहुल देशमुख यांनी मुंबईनाका पोलिसांना दिले आहे.

कर्मयोगीनगर येथे अंबडच्या आर. डी. मायनिंग इक्वीपमेंट कंपनीने सीएसआर फंडातून काही वर्षापूर्वी आर डी सर्कल हे वाहतूक बेट विकसित केले आहे. यामुळे हा परिसर सुशोभीत झाला. या सर्कलवरील विद्युत दिवे, लोखंडी साहित्य, पाणी पुरवठ्याचे पाईप, एलईडी फोकस, लोखंडी पट्ट्या आदी साहित्याची वारंवार चोरी होत आहे. सुशोभीकरणाच्या साहित्याचीही तोडफोड केली जात आहे.

आता महापालिका याच कंपनीच्या सीएसआर फंडातून सर्कलजवळ मोकळ्या जागेत जॉगिंग ट्रॅक आणि सेल्फी पॉइंट विकसित करून घेत आहे. कंपनीचे संचालक राहुल देशमुख यांच्या संकल्पनेतून येथे काही महिन्यांपासून काम सुरू आहे. येथील बांधकाम साहित्यासह इतर साहित्याचीही वारंवार चोरी होत आहे. कंपनीने याप्रकरणी गेल्या साडेतीन वर्षात मुंबईनाका पोलिसांना वारंवार लेखी स्वरुपात कळवून तक्रार केली, तरीही चोर्‍यांना आळा बसत नाही. संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा शोध घ्यावा, अशी मागणी आर. डी. मायनिंग कंपनीने १९ मे आणि २२ मे २०२३ रोजी मुंबईनाका पोलिसांकडे केली आहे. या तक्रार स्वरुपाच्या पत्राची प्रत त्यांनी नाशिक महापालिका आयुक्तांनाही माहितीसाठी दिली आहे.


Previous Post

सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीचे आमिष; सहा लाखास गंडा

Next Post

UPSC परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी

Next Post

UPSC परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी

ताज्या बातम्या

अहोभाग्य! तब्बल ५८ पुणेकरांना मिळाला चोरीचा मुद्देमाल; पोलिसांच्या तपासाचे फलित

June 5, 2023

आंदोलक कुस्तीपटूंनी मध्यरात्री घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; काय निर्णय घेणार?

June 5, 2023

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group