नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रभाग क्रमांक ३० मधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे खडी व डांबर टाकून बुजवावेत, अशी मागणी शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केली आहे. महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांना शुक्रवारी, २६ ऑगस्ट २०२२ रोजी याबाबतचे निवेदन देण्यात आले.
नाशिकमधील जुना प्रभाग क्रमांक २४, नवीन रचनेनंतरचा प्रभाग क्रमांक ३० मध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. सध्या माती, मुरूम व खडीने खड्डे बुजविले जात आहेत. ही तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. आवश्यकता असलेल्या रस्त्याचे संपूर्ण डांबरीकरण करावे, सिटी सेंटर मॉल सिग्नल ते गोविंदनगर, बाजीरावनगरमधील आर डी सर्कल ते मिलिंदनगर पूल, उंटवाडी गाव ते कालिका पार्क, कर्मयोगीनगरमधील नयनतारा इमारत ते बडदेनगर या मुख्य रस्त्यांवरील खड्डेही डांबर व खडीने बुजवावेत. कर्मयोगीनगर, बाजीरावनगर, तिडकेनगर, सद्गुरूनगर, काशिकोनगर, कोठावदे मळा, कालिका पार्क, बडदेनगर, जुने सिडको, जगतापनगर, कालिकानगर, गोविंदनगरसह प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डेही डांबर व खडीने बुजवावेत, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, संजय टकले, डॉ. शशीकांत मोरे, विनोद पोळ, विठ्ठलराव देवरे, भालचंद्र रत्नपारखी, राधाकृष्ण जाधव, सखाराम देवरे, विजय डोंगरे, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब दिंडे, गुलाब शिंदे, दिलीप निकम, बापुराव पाटील, मीना टकले, उज्ज्वला सोनजे, सुनीता उबाळे, शीतल गवळी, रूपाली मुसळे, वंदना पाटील, दिलीप दिवाणे, मगन तलवार, अशोक पाटील, तेजस अमृतकर, हरिष काळे, पुरुषोत्तम शिरुडे, मनोज वाणी, संकेत गायकवाड (देशमुख) आदींसह रहिवाशांनी केली आहे.