नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे नाशिक शहराच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था समोर आलेली आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपुलावरील पाईप खराब झाल्यामुळे पाणी रस्त्यावर वाहन चालकाच्या अंगावर पडते. इंदिरानगर अंडरपासच्या येथे पावसाच्या पाण्यामुळे तळे निर्माण झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या देखभालीसाठी करोडो रुपये खर्च केले जात असताना रस्त्याची अशी दुरावस्था होण्याची कारणे काय? असा प्रश्न आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केलेला आहे.
पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली नव्हती का? असा प्रश्न विचारताना मेंटेन्स केलेला असताना रस्त्याची दुरावस्था होते कशी? असा प्रश्नही त्यांनी प्रकल्प संचालक यांना विचारला. मुंबईत नाशिकच्या पेक्षा जास्त पाऊस असताना नाशिकच्या रस्त्याची दुरावस्था होण्याची कारणे शोधून काढण्यासाठी चौकशी करण्याची मागणी करतानाच उड्डाण पुलाचे सर्व पाईप बदलून मोठ्या व्यासाचे पाईप टाकण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी केली.
या बाबत ८ दिवसात कार्यवाही करून सुधारणा करण्याची मागणी करतानाच महामार्गाच्या दुरावस्था झाले बाबत लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रकल्प संचालक यांना दिले. याबाबत ८ दिवसात कार्यवाही न झाल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा देखील दिलेला आहे.
Maintain and repair National Highways within Nashik city limits,
Nashik City National Highway Bad Condition MLA Devyani Farande
Threat Officers Complaint Minister Nitin Gadkari