मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उड्डाणपुलामुळे खरंच चांदणी चौकातील वाहतुकीची समस्या सुटली का… अशी आहे वस्तुस्थिती (व्हिडिओ)

by India Darpan
सप्टेंबर 9, 2023 | 5:18 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Pune Chandni Chowk

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या महिन्यात चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. शिवाय आता पुण्यात वाहतुकीची समस्याच राहणार नसल्याचा भक्कम दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात आला. तसेच, या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्यावरुन मोठा राजकीय ड्रामाही रंगला. हे सर्व केल्यानंतरही प्रत्यक्षात चांदणी चौक परिसरातील परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नाही. वास्तविक वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणेकरांना अनेकानेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

गेल्या १२ ऑगस्ट रोजी चांदणी चौक पुलाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दावा करण्यात आला की,
पुणे शहरात एनडीए चौकातील राष्ट्रीय महामार्ग क्र.48 वर सर्व मार्गिकांसहित एकूण 16.98 किलोमीटर लांबीचा पायाभूत सुविधा व रस्ते विकास प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाची किंमत 865 कोटी असून प्रकल्पामुळे परिसरात अखंड आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक सहा पदरी करण्यात आली असून अंतर्गत आणि बाह्य सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 8 वेगवेगळ्या मार्गिकांची उभारणी करण्यात आली आहे.
मुळशी-सातारा, मुळशी-मुंबई, मुळशी-पाषाण, सातारा/कोथरूड-मुळशी, पाषाण-मुंबई, पाषाण-सातारा, सातारा/कोथारूड-पाषाण आणि मुख्य रस्त्यावरून सेवा रस्त्याकडे अशा आठ मार्गिका आहेत.
एनडीए ते पाषाण ओव्हरपास आणि पाषाण ते मुंबई तसेच सातारा/कोथरूड ते मुळशी असे दोन अंडरपासही करण्यात आले आहेत.
एनडीए चौकात येणारी सर्व बाजूंची वाहतूक सिग्नलमुक्त करण्यात आली आहे. जून्या पुलाच्या ठिकाणी नवा विस्तारीत पूल उभारण्यात आला आहे. परिसराचे सुशोभिकरणही करण्यात येत आहे.
खेड आणि मंचर येथील वळण रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची लांबी 14.137 किलोमीटर असून प्रकल्पाची किंमत 495 कोटी आहे.

अशी आहे सद्यस्थिती

#पुणे #चांदणीचौक
कामे अर्धवट असताना मोठ्या थाटामाटात उड्डाणपुलाचे उद्घाटन करुन श्रेय घेतले.
आता या वाहतूक कोंडीचे श्रेय नव्या पुण्याचे शिल्पकार घेणार का?#pune#chandanichowk #PuneNews#punetraffic pic.twitter.com/t7p680SWvR

— Brijmohan Patil (@brizpatil) September 1, 2023

आमदार सत्यजित तांबे म्हणाले…
विधान परिषदेतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, ‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन तर झाले, मात्र परिस्थिती अजून बिकट झालेली दिसतेय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 397 कोटी खर्च करून 8 रॅम्प, 2 सर्व्हिस रोड, 2 अंडरपास, 4 पूल असे 17 किलोमीटर रस्त्याचे काम केलेले आहे. मात्र या रस्त्यांवर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आहेत, तर काही ठिकाणी फलक लावलेले दिसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता समजत नाही आणि जेथे फलक लावले आहेत ते दिसत नाहीत. रस्ता चुकला की नागरिकांना दोन-दोन किलोमीटर फिरून यावं लागत आहे. नवीन रस्ते झाले असले तरी पादचाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय, तसेच सर्व दिशांनी एकत्र येणाऱ्या अनेक रस्त्यांमुळे अपघाताची भीतीही वाढली आहे. त्यामुळे फक्त वाहतूक कोंडीच नाही, तर लोकांची मानसिक कोंडी देखील होतेय. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अवाढव्य खर्च करून नवीन रस्त्यांचा अट्टहास केला असला तरी समस्या काही सुटलेली दिसत नाही. हे सर्व बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणे, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसतंय, असे तांबे यांनी म्हटले आहे.

'आयटी हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय.

चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या… pic.twitter.com/8lwJr4qirg

— Satyajeet Tambe (@satyajeettambe) September 8, 2023

मनसेचे पदाधिकारी अभिजीत चौगुले यांनी दोन व्हिडिओ शेअर करुन वस्तुस्थिती दाखवली आहे

८००- १०००करोड रुपये खर्च करून जो चांदणी चौक विस्तारीकरण केले व हजारो-कोटी रुपये खर्च करून जो शाही उद्घाटन सोहळ्यात "ट्रॅफिक मुक्त चांदणी चौक" अशी घोषणा दिली त्याचे हे वास्तवरुपी उदाहरण.#पुणे #PuneNews #kothrud @lokmat @SakalMediaNews @TV9Marathi @PuneTimesOnline @PMCPune @ZeeNews pic.twitter.com/mE4FrlGkP2

— अभिजीत चौगुले. (@abhichougulemns) September 8, 2023

Pune City Chandani Chowk Flyover Traffic Jam Video

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

…तर तुमची गडकरींकडेच तक्रार करते… आमदार फरांदेंचा अधिकऱ्यांना इशारा…

Next Post

नॅक मानांकन न घेणाऱ्या कॉलेजेसचे काय होणार… मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले….

Next Post
1140x570 1

नॅक मानांकन न घेणाऱ्या कॉलेजेसचे काय होणार... मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले....

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011