गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिककरांसाठी खुषखबर! येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत वाहने मोफत चार्जिंग करा

पोलारिस कंपनी शहरात दीडशे इलेक्ट्रिक चार्जिंग पाईट उभारणार

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2022 | 4:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 6404

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहराने पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलारिस रिन्यूएबल सॉल्यूशंस प्राइवेट लिमिटेड कंपनी शहरात सुमारे दीडशे इलेक्ट्रिक चार्जिंग पाईट उभारणार असून यातील पहिले चार्जिंग पाईट कार्यान्वित झाले आहे. सदरच्या चार्जिंग पाईटवर येत्या १५ फेब्रुवारीपर्यत मोफत चार्जिंगची सवलत देण्यात आली आहे. हे चार्जिंग पाईट बॉईस टाऊन स्कूल,विसे मळा या ठिकाणी श्री अथर्व इलेक्ट्रिक्स यांच्या साहाय्याने उभारण्यात आले आहे. या चार्जिंग पाईटचे उद्घाटन नगरसेवक समीर उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करून करण्यात आले.

वाढता इंधन खर्च आणि त्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे खासगी विद्युत वाहनांचा वापर वाढतांना दिसत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाहनचालकांना चार्जिंग पाईटची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण होणार आहे. यासाठी शहरात चार्जिंग पाईटचे जाळे असणे लाभदायक ठरणार आहे. यासाठी पोलारीसने पुढाकार घेतला आहे. शहर विकासात अशाप्रकारचे चार्जिंग पाईट महत्वाचे ठरणार असल्याचे कांबळे यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना सांगितले.

पोलारिसचे संचालक पुष्कर पंचाक्षरी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, येत्या मार्च अखेरपर्यत दीडशे चार्जिंग पाईटची उभारणी केली जाणार आहे. शहरातील सर्व मुख्य परिसरात ही उभारणी केली जाईल. या माध्यमातून राज्यात सर्वात प्रथम चार्जिंग पाईटचे नेटवर्क तयार करायचा आमचा प्रयत्न आहे. सध्या शहरात चार्जिंग पाईटची संख्या अत्यंत अल्प आहे. त्यामुळे नागरिक वाहन खरेदी करतांना पटकन इलेक्ट्रिक वाहनाचा विचार करत नाही. हीच अडचण दूर करायची आहे. जेणेकरून लोक इलेक्ट्रिक वाहन वापराकडे वळतील. पर्यायाने प्रदूषण कमी होईल. यावेळी स्वप्नील ताजानपुरे, कुवर गुजराल, श्रेयस पाध्ये, निलेश झांबरे यांच्यासह पोलारीसची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर्व वाहनांसाठी पुढील वर्षापासून हे बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Next Post

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला अपघात; बालंबाल बचावल्या

India Darpan

Next Post
4627 n

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला अपघात; बालंबाल बचावल्या

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011