पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. त्या जिल्ह्यातील मावळ परिसराच्या दौऱ्यावर होत्या. अपघात झाल्याची माहिती खुद्द शहाणे यांनीच फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. कार आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला आहे. त्यात कारचे जबरदस्त नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने किशोरी शहाणे या सुखरुप आहेत. फेसबुक पोस्टमध्ये शहाणे यांनी लिहीले आहे की, आमच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने आमचा जीव वाचला आहे. दैवाच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. जाको रखे सैया मार खाके ना कोई, असे त्यांनी नमूद केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कारचे फोटोही शेअर केले आहेत.