नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर परिसरात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढते आहे. तसेच, या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. आजही एक भूषण अपघात द्वारका-अडगाव या मार्गावरील उड्डाणपुलावर झाला आहे.
कंटेनरने आयशरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आई व मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. व्दारका ते आडगाव मार्गावरील उड्डाणपुलावर हा भीषण अपघात आज सकाळी झाला. कंटेनरमध्ये ड्रायव्हर शेजारी आई आणि मुलगी बसली होती. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उड्डाणपुलावर नेहमीच वाहने वेगाने धावतात. त्यात अनेक अपघात या पुलावर अगोदर झालेले आहेत. आज झालेल्या अपघातात आई व मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तातडीने मायलेकींना उपचारार्थ दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. हा कंटेनर इगतपुरीहून धुळ्याच्या दिशेने जात होता.
Nashik City Flyover Accident Mother Daughter Killed