नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील त्रिमुर्ती चौक भागात घरकाम करीत असतांना पाय घसरून पडल्याने २४ वर्षीय विवाहीतेचा मृत्यू झाला. कोमल भरत गुंजाळ (वय २४, रा.त्रिमुर्ती चौक, सिडको) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल गुंजाळ या शुक्रवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास घरकाम करीत असतांना ही घटना घडली होती. ओट्यावर पाणी टाकून फरशी पुसत असतांना अचानक पाय घसरून त्या पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या पोटाला वर्मी मार लागल्याने पती भरत गुंजाळ यांनी त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. मंगळवारी (दि.१६) उपचार सुरू असतांना डॉ. मोहिल शहा यांनी त्यांना मृत घोषित केले. अदिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658721635560751104?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658754067957714944?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1658753968418480128?s=20