India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लंडनहून साहित्य तर काही मिळाले नाही पण ३५ हजार गेले… नाशिकच्या तरुणीची अशी झाली फसवणूक

India Darpan by India Darpan
May 17, 2023
in क्राईम डायरी
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लंडन येथून साहित्य पाठविल्याची बतावणी करून या भामट्यांनी तरूणीस ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडून ३५ हजार रूपयांना गंडा घातला आहे. सोशल मीडियावर झालेली विदेशातील अनोळखी व्यक्तीची ओळखीतून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी याप्रकरणी श्रृती शुक्ला (रा.गोविंदनगर) या युवतीने तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिघूल ऑईजिन व मुजायद्दीन खान अशी संशयित ठकबाजांची नावे आहेत.

इन्स्टाग्राम या सोशल साईडवर तरूणीची दोघा भामट्यांशी ओळख झाली होती. तिघा मध्ये वारंवार चॅटींग होत असल्याने उत्सुकतेपोटी तरूणीने विदेशातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी लंडन येथे सोन्याच्या दागिण्यांसह ब्रॅण्डेड घड्याळ ,पर्स आणि अन्य वस्तू स्व:स्तात मिळत असल्याचे सांगितले. त्यामुळे तरूणीने काही वस्तू खरेदी करण्याची अपेक्षा व्यक्त केली असता ही फसवणुक झाली.

भामट्यांनी आम्ही तुला सोन्याचे दागिणे पाठवतो अशी बतावणी करून तरूणीस ऑनलाईन पैसे पाठविण्यास भाग पाडले. शुक्ला यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संबधीताना पैसे पाठवूनही अद्याप वस्तू मिळाल्या नाही तसेच त्यांचा संपर्क होत नसल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक अहिरे करीत आहेत.


Previous Post

छत्रपती संभाजीनगर की औरंगाबाद? जिल्हाधिकाऱ्यांनी काढले हे आदेश

Next Post

घरात पाय घसरून पडल्याने २४ वर्षीय विवाहीतेचा मृत्यू… सिडकोतील घटना

Next Post
प्रातिनिधीक फोटो

घरात पाय घसरून पडल्याने २४ वर्षीय विवाहीतेचा मृत्यू... सिडकोतील घटना

ताज्या बातम्या

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023

या मालिकेच्या सेटवर लागली आग, खोली जळून खाक

May 31, 2023

देवळा तालुक्यात भंगार गोदामाला आग… परिसरात धुराचे मोठे लोट (व्हिडिओ)

May 31, 2023

मालेगावात अवैधरित्या या औषधांची सर्रास विक्री; पोलिसांनी जप्त केला मोठा साठा (व्हिडिओ)

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group