नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील न्यायालयाच्या प्रवेशव्दारा जवळ सदनिका खरेदी विक्री व्यवहारातील वादातून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी पोलिस दप्तरी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाईलाल शिवजी पटेल (५२ रा.पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित यांच्या सदनिका खरेदी विक्री व्यवहारातील पैश्यांवरून वाद सुरू आहे. गेल्या सोमवारी (दि.४) सकाळी महिला व तिचा पती न्यायालयीन कामकाजासाठी नाशिकरोड कोर्टात गेले असता ही घटना घडली. प्रवेशद्वारावर संशयिताने दांम्पत्यास गाठून दमदाटी केली. यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक कोळी करीत आहेत.
प्रवाशी महिलेकडे बघून अश्लिल हावभाव
व्दारका भागात बसमधून उतरलेल्या प्रवाशी महिलेकडे बघून एकाने अश्लिल हावभाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिलेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने शिवीगाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद लक्ष्मण कुरे (२८, रा. सिडको) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता गुरूवारी (दि.७) दुपारच्या सुमारास द्वारकाभागात बसमधून उतरली असता ही घटना घडली. बाहेरगावहून परतल्याने ती पंजाब हॉटेल जवळ उभी असतांना संशयिताने तिच्याकडे बघून अश्लिल हावभाव केले. महिलेने त्यास तिने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने शिवीगाळ केली. अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Women Molestation