नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळ्या भागातून मालवाहू पिकअपसह पार्क केलेली दुचाकी चोरटयांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ आणि सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना त्र्यंबकरोडवरील सातपूर आयटीआय परिसरात घडली. रोशन साहेबराव जानकर (रा.जालखेड ता.दिंडोरी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जानकर शुक्रवारी निमा पावर हाऊस प्रदर्शन बघण्यासाठी त्र्यंबकरोडवरील आयटीआय भागात आले होते. आयटीआय परिसरात पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर एमएच १५ सीएफ ३९६२ चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गावित करीत आहेत.
दुसरी घटना मानेनगर भागात घडली. येथे राहणारे शंकर सुखदेव नागरे (रा.आत्माराम सोसा.मानेनगर) यांची एमएच १५ डीके ४१६१ मालवाहू पिकअप शुक्रवारी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.