नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे आठ लाख रूपयांच्या ऐवज लंपास केला. नाशिक तालुक्यातील शिलापूर येथे ही घरफोडी झाली. यात चोरटयांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड चोरुन नेले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय रंगनाथ कहांडळ (रा.शिलापूर ओढा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कहांडळ कुटुंबिय गुरूवारी (दि.२५) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराची कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचे दागिणे असा सुमारे ८ लाख ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. तीन जणांनी ही चोरी केल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1662394001075613696?s=20