नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ८५ हजाराच्या ऐवज लंपास केले. औद्योगीक वसाहतीतील जाधव संकुल भागात ही घरफोडी झाली. यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरीला गेले आहे. याप्रकरणी किशोर शिवाजी पाटील (रा.गोल्डन पार्क, जाधव संकुल, अंबड लिंकरोड) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटील कुटुंबिय दि.१३ ते १६ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८४ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.
घरात शिरून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरले
गंगापूररोड वरील विद्या विकास सर्कल भागात घरात शिरून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कृष्णा सुजितकुमार विसपूते (१८ रा.रामबाग अपा.सागर स्विटजवळ) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिह्यातील विसपूते हा शिक्षणानिमित्त सदर ठिकाणी अन्य मित्रांसमवेत वास्तव्यास आहे. मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास नजीक जेवणासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून सुमारे ४० हजार ७०० रूपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.