नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस दप्तरी मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना पेठरोड भागात घडली. पार्वती मनोहर तुंबडे (३२ रा.शिव रो हाऊस भगवानबाबा नगर,मेघराज बेकरीमागे) यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये खिडकीस ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वामन दळवी (रा.पंचशिलनगर) यांनी याबाबत खबर दिली आहे.
दुस-या घटनेत अभय दिवाकर राजे (३८ रा.संगवी अपा.पोकार कॉलनी,दिंडोरीरोड) यांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. वडिल दिवाकर राजे यांनी याबाबत खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास जमादार वाघ व हवालदार भोज करीत आहेत.