India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नाशकात स्टेट बँकेला ८६ लाखांचा गंडा; असा उघड झाला हा प्रकार

India Darpan by India Darpan
May 20, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टेट बँक ऑफ इंडियाला ८६ लाखाला गंडा घातल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे गृहकर्ज मिळवून सात कर्जदारांनी गृह खरेदी केल्याचे दाखवून ही फसवणूक केली आहे.

पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार विवेक उगले, अजय आठवले, रोशनी जयस्वार, संतोष जयस्वार, राजू कलमट्टी, अश्विन साळवे व किरण आठवले अशी ठकबाज कर्जदारांची नावे आहेत. या सर्वांनी २०२१ मध्ये गृहकर्जासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रस्ताव सादर केले होते. एन.डी.पटेल रोडवरील केंद्रीय कार्यालयाने कागदपत्राच्या आधारे संबधितांना गृहकर्ज मंजूर केल्याने सदरच्या रकमा वेगवेगळया बँकेखात्यात वर्ग करण्यात आल्या होत्या.

मात्र कर्जाची हप्ते संबधितांनी वेळेवर भरले नाही. त्यामुळे बँकेच्या वतीने मालमत्तांसह कर्जदारांचा शोध घेण्यात आला असता हा बनाव समोर आला आहे. बँकेने कागदपत्रांची शहानिशा केली असता बनावट कागदपत्राच्या आधारे या कर्जदारांनी हा गंडा घातला असून याप्रकरणी व्यवस्थापक प्रकाश सावंत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पिसे करीत आहेत.


Previous Post

नाशिक विमानसेवेच्या ब्रँडिंगसाठी या संस्थेने घेतला पुढाकार

Next Post

काकासह पुतण्या आणि पुतणीवर त्रिकुटाचा प्राणघातक हल्ला… तिघांवर गुन्हा दाखल

Next Post

काकासह पुतण्या आणि पुतणीवर त्रिकुटाचा प्राणघातक हल्ला... तिघांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group