नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचशिलनगर येथील जनता विद्यालय परिसरात जुन्या वादाची कुरापत काढून टोळक्याने एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान मस्जीद शेख (२४),समीर मस्जीद शेख (२१ रा. दोघे रा.मदरनगर,वडाळागाव), आदित्य अर्जुन साळवे (२२ रा. बुध्द मंदिरासमोर,आगरटाकळी) व हर्षल उर्फ बाळा दिलीप गायकवाड (२४ रा.भिमशक्तीनगर,आगरटाकळी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी यश अशोक पवार (२२ रा.पाटसकर चाळ,सोनवणे बाबा चौक, संत कबीर मार्ग समतानग आगरटाकळी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पवार गुरूवारी (दि.११) रात्री पंचशिलनगर भागातील अशोक दिवे क्रिडा संकुल भागात गेला होता. जनता विद्यालयाजवळ संशयितांनी त्यास गाठून जुन्या वादाची कुरापत काढून यश पवार यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या मारहाणीत संशयित टोळक्याने काही तरी वजनी वस्तूचा वापर केल्याने पवार जखमी झाला असून, अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.