नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावरकरनगर भागात वाहन चालविण्याच्या वादातून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी हेमंत ज्ञानेश्वर पाटील (२३ रा.अनुसयानगर, खर्जुळ मळा, जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात मारहाण आणि शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश पोपट आहिरे व त्याचे तीन साथीदार अशी तरूणास मारहाण करणा-याचे नाव आहे. पाटील रविवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास सावरकरनगर भागात गेला होता. शंकर नगर येथील येवले मिसळ परिसरातून तो आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना समाधान वाईन शॉप भागातील आदित्य पेट्रोलपंपासमोर संशयितांनी त्यास अडविले.
यावेळी गाडी हळू चालव या कारणातून कुरापत काढून टोळक्याने त्यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत कुठल्यातरी हत्याराचा वापर करण्यात आल्याने पाटील जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक बागुल करीत आहेत.
?विवाहितेचा छळ करणाऱ्या *पुण्यातील सासरच्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल*
https://t.co/71N0X04did #indiadarpanlive #nashik #city #crime #women #molestation #pune #family #booked— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 8, 2023
? 'तारक मेहता' मालिकेत मोठा ट्विस्ट
*भिडेच्या आयुष्यात नेमकं असं काय घडणार* (बघा व्हिडिओ)
https://t.co/pVVq1t4J93#indiadarpanlive #tmkoc #tv #serial #new #twist #bhide #tappu #sonu— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 8, 2023