नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठक्कर बाजार बसस्थानक परिसरात दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने एकाने महिलेस शिवीगाळ व दमदाटी करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. महिलेचा विनयभंग करणा-या संशयिताचे नाव गणेश देवराम चौधरी (५८ रा.राधागिरी अपा.राजीवनगर) असे आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार महिला गुरूवारी (दि.१८) ठक्करबाजार परिसरात गेली होती. दुपारच्या सुमारास ती बसस्थानक परिसरातील जिल्हा रूग्णालयाच्या भिंतीलगत उभी असतांना ही घटना घडली. दुचाकीवर आलेल्या संशयिताने तिला आपल्या मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह धरला. यावेळी महिलेने त्यास नकार दिला असता त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659862489704824832?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659862595199959040?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1659862560076886016?s=20