नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोड भागात दुचाकीस्वार तरूणीची वाट अडवित रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. वसिम नासिर शेख असे संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडितेच्या बहिणीने याप्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी (दि.१५) ती आपल्या बहिणीच्या घरी अॅक्टीव्हा दुचाकीवर जात असतांना ही घटना घडली. शरदचंद्र मार्केट सिग्नल वरून ती तारवाला नगर सिग्नलच्या दिशेने प्रवास करीत असतांना दिंडोरीरोडवरील जलविज्ञान गेट समोर पाठीमागून रिक्षा घेवून आलेल्या संशयिताने तिची वाट अडविली. यावेळी पीडितेच्या बहिणीने भद्रकाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून संशयिताने तरूणीस शिवीगाळ व मारहाण करीत विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहेत.