मंगलकार्यालयाच्या आवारातील लोखंडी गेटसह पाईप चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मेरी रासबिहारी लिंकरोड भागात मंगलकार्यालयाच्या आवारातील लोखंडी गेटसह पाईप चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी राजेंद्र निवृत्ती गोळेसर (रा.महालक्ष्मी हेरिटेज,चिंचबनरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळेसर यांचे मेरी रासबिहारी लिंकरोड भागात राजमाता नावाचे मंगल कार्यालय आहे. या मंगलकार्यालयाच्या आवारात पडलेले तीन लोखंडी गेट व दोन लोखंडी पाईप असा सुमारे १८ हजार २०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि.१०) रात्री घडली. अधिक तपास पोलिस नाईक लिलके करीत आहेत.
……
चोरट्यांनी तीन सिलेंडर टाक्या केल्या लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात बंगल्याच्या आवारातील लोखंडी टेबलाखाली ठेवलेल्या एक भरलेली व दोन रिकाम्या अश्या तीन सिलेंडर टाक्या चोरट्यांनी लंपास केल्या. याप्रकरणी रावसाहेब एकनाथ झेट (रा.धनश्री बंगला,बाफना बाजार मागे लक्ष्मीनगर) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झेट कुटुंबिय मंगळवारी (दि.१४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या आवारात शिरून लोखंडी टेबलाखाली ठेवलेले सुमारे सहा हजार रूपये किमतीचे तीन सिलेंडर चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक माळवाळ करीत आहेत.