नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या सोळा जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हे सर्व जण टाईम ओपन नावाचा मटका जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा समारे सात हजार रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय मोतीलाल पाराशरे (५८ रा.कुमावतनगर पेठरोड),गणेश विजय जाधव (४६ रा.पिराजी पागा शेजारी भद्रकाली),मुरलीधर सुकदेव बागुल (६६ रा.कमलनगर हिरावाडी),भगीरथ रामचंद्र चव्हाण (७२ रा.माणिकखांब ता.इगतपुरी),सुनिल चिंतामन कदम (३७ रा.डिंगरअळी,संभाजी चौक),सचिन प्रकाश काळे (२५ रा.मातंगवाडा शिवशक्तीचौक),सुरेश प्रसाद महावीर प्रसाद गोलेद्र (५६ रा.सिताबाई चाळ,वाघाडी),राहूल बाळकृष्ण भावसार (३८ रा.इंदिरागांधी हॉस्पिटल मागे,पंचवटी कारंजा),प्रविण भास्कर रणदिवे (५२ रा.जीपीओ मागेपंचशिलनगर),उमेश मोतीराम सोनवणे (४२ रा.दत्तचौक,सिडको),विकास ज्ञानेश्वर वाघ (२९ रा.मांगवाडा,भद्रकाली रिक्षा स्टॅण्ड जवळ),दिगंबर वामन कोरडे (रा.रामरावनगर,घोटी ता.इगतपुरी),किसन हिरालाल साखला (५८ रा.पत्र्यांची चाळ,रामकुंड),अंजनीकुमार गोवर्धनलाल पटेल (३८ रा.सेलेरिओ टेलर्स शालीमार,जिमखान्याजवळ),शेषराव समाधान दिवाणे (४६ रा.श्रीकृष्णनगर,अंबड) व पाशा खलील शेख (३५ रा.दुधबाजार दर्गाजवळ भद्रकाली) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. ठाकरे गल्लीतील संदर्भ हॉस्पिटलच्या भिंतीजवळील मोकळया जागेत काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.६) भद्रकाली पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकले. ते आर्थीक फायद्यासाठी पैसे लावून टाईम ओपन नावाचा मटका जुगार खेळत होते. या कारवाईत ६ हजार ९६० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) कार्यालयातील हवालदार कविश्वर खराटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक आर.बी.कोळी करीत आहेत.