शेकोटीवर शेकत असतांना भाजल्याने २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावरील आंबेडकर नगर भागात शेकोटीवर शेकत असतांना भाजल्याने २९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. विनय लक्ष्मण पवार (२९ रा.कला वैभव सोसा.सिध्दार्थ कामत हॉटेल समोर आंबेडकरनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पवार मंगळवारी (दि.१) रात्री आपल्या घरासमोर शेकोटीवर शेकत असतांना ही घटना घडली होती. शेकोटीत अचानक भडका उडल्याने त्याची दोन्ही पाय भाजली होती. गंभीर अवस्थेत पत्नी शितल पवार यांनी त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असतांना डॉ.पंकज खंगाल यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बकाल करीत आहेत.
वृध्दाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापूररोड भागात मोबाईलवर बोलत शतपावली करणा-या वृध्दाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी जयेश दिलीपकुमार मजेठिया (५९ रा.निर्मला कॅन्व्हेंट स्कूल जवळ,चैतन्यनगर,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजेठिया मंगळवारी (दि.३१) रात्री शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते. साईबाबा मंदिर ते शांतिनिकेत कॉलनी दरम्यान ते फोनवर बोलत असतांना ही घटना घडली. रस्त्याने मोबाईलवर बोलत पायी जात असतांना उस्मान वडापाव दुकानासमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.