नाशिक : घरकाम करणा-या महिलेने दीड लाख रुपयाचे दागिने लंपास केले. या मोलकरणीने मालकाच्या घरातील दागिण्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदू संतोष सोनवणे (३८ रा.समतानगर,आगरटाकळी) असे संशयित मोलकरणीचे नाव आहे. प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मिना मुकूल आगाशे (५० रा.आॅरेंज बिल्डींग,ड्रिम सिटी तपोवनरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. आगाशे यांच्याकडे संशयित महिलाकाम करते. गेल्या १ मार्च ते ५ नोव्हेंबर दरम्यान संशयित महिलेने बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे १ लाख ६५ हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. त्यात तीन सोन्याच्या अंगठ्या,कानातले,सोनसाखळी, व एक लॉकेट आदी दागिण्यांचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.