नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपुर कॉलनी परिसरात दहा वाहनांची तोडफोड करणा-याला पोलिसांनी गजाआड करुन त्याची धिंड काढली. ज्या ठिकाणी वाहने फोडली तेथून ही धिंड काढण्यात आल्यामुळे ही धिंड दहशत माजवण्याला चपराक आहे. सातपुरच्या कॉलनी परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान मद्यपान करून फिरत असतांना नशेत वाहनांची तोडफोड केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे. संशयित आरोपी आकाश निवृत्ती जगताप हा एमएच बी कॉलनीतील रहिवासी आहे. सातपुर परीसरात वाहन तोंडफोडीच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पोलीसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती, त्यानंतर ही कारवाई पोलीसांनी केल्याने नागरिकांनी टाळ्या वाजवत पोलिसांचे कौतुक केले आहे. सातपूर पोलीसांनी संशयित तरुणाला सिसिटीव्हीच्या माध्यमातून तपास करत अटक करून कारवाई केली आहे.