बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शाही साखरपुड्यात लाडक्या श्वानाने आणली अंगठी; अशी झाली रिंग सेरेमनी (बघा व्हिडिओ)

by India Darpan
जानेवारी 20, 2023 | 4:11 pm
in राष्ट्रीय
0
Anant Ambani Radhika Merchant 2 e1674211179428

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि ख्यातनाम नृत्यांगना राधिका मर्चंट यांचा साखरपुडा सध्या विशेष चर्चेचा ठरत आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पूर्णतः पारंपरिक विधींनी साखरपुडा संपन्न झाला मुंबईतील अंबानी निवासस्थानी हा सोहळा पार पडला.

गुजराथी हिंदू कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या गोल-धना आणि चुनरी विधी यांसारख्या शतकानुशतके जुन्या परंपरा कार्यक्रमस्थळ आणि कौटुंबिक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडल्या. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या. अनंतची आई श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अंबानी कुटुंबातील सदस्यांनी केलेले नृत्य हे कार्यक्रमाचे आकर्षण होते.

गोल-धनाचा शाब्दिक अर्थ आहे गूळ आणि धणे – गोल-धणा हा गुजराती परंपरांमध्ये लग्नापूर्वीचा समारंभ आहे. कार्यक्रमादरम्यान या वस्तू वराच्या घरी पोहोचवल्या जातात. वधूचे कुटुंब वराच्या घरी भेटवस्तू आणि मिठाई आणतात आणि नंतर जोडपे अंगठ्याची देवाणघेवाण करतात. यानंतर हे जोडपे आपल्या वडिलांकडून आशीर्वाद घेतात.

अनंतची बहीण ईशा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रथम राधिकाला आणि मर्चंट कटुंबियाना त्यांच्या निवासस्थानी जाऊन संध्याकाळच्या उत्सवासाठी आमंत्रित केले. यानंतर, अंबानी कुटुंबाने वधू पक्षाचे त्यांच्या निवासस्थानी आरती आणि मंत्रोच्चारात स्वागत केले.

संपूर्ण कुटुंब अनंत आणि राधिकासोबत या जोडप्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान कृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेले. तेथून सर्वजण गणेश पूजनाच्या ठिकाणी रवाना झाले आणि त्यानंतर पारंपरिक लगन पत्रिका पठण झाले. गोल-धना आणि चुनरी समारंभानंतर अनंत आणि राधिकाच्या कुटुंबांमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. श्रीमती नीता अंबानी यांच्या नेतृत्वाखालील अंबानी कुटुंबातील सदस्यांनी एक जबरदस्त आणि आकर्षक नृत्य सादरीकरन केले ज्याला उपस्थित लोकांच्या टाळ्या मिळाल्या.

बहीण ईशाने रिंग सोहळ्याची घोषणा करताच अनंत आणि राधिकाने कुटुंब आणि मित्रांसोबत रिंग्जची देवाणघेवाण केली आनि सर्वांचे आशीर्वाद घेतले. अनंत आणि राधिका आता काही वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि आजच्या एंगेजमेंट विधी नंतर उभयता वैवाहिक जीवनाच्या दिशेने अजून जवळ येतील. दोन्ही कुटुंबानी राधिका आणि अनंतसाठी सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेतल्या

नीता आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत यांनी अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केले आणि तेव्हापासून ते रिलायन्स इंडस्ट्रीजशी विविध पदांवर कार्यरत आहेत. ते जिओ प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक मंडळावर आहेत. ते सध्या रिलायन्सच्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख आहेत. राधिका, शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी, न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवीधर आहे आणि एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात कुत्र्याने आणली अंगठी….
असा झाला रिंग सेरेमनी सोहळा…. #AnantAmbaniRadhikaMerchant #AnantRadhikaEngagement #AnantRadhika #AnantAmbaniengagement pic.twitter.com/3tR0nskPJU

— India Darpan Live (@IndiaDarpanLive) January 20, 2023

Anant Ambani And Radhika Merchant Engagement Ring ceremony

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनांची तोडफोड करणा-याला पोलिसांनी केले गजाआड; वाहन जेथे फोडले तेथूनच काढली धिंड

Next Post

फिरोज शेखला सोमवार पर्यंत मोक्का न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

India Darpan

Next Post
court 1

फिरोज शेखला सोमवार पर्यंत मोक्का न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011