नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. मुंबई आग्रा महामार्गावर हे दोन्ही अपघात झाले होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात व आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. पहिला अपघात गेल्या २४ डिसेंबर रोजी औद्योगीक वसाहतीतील एक्स्लो पॉईंट भागात झाला होता. रस्त्याने पायी जाणा-या ४० वर्षीय अनोळखी पुरूषास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाल्याने १०८ अॅम्ब्युलन्सचे डॉ.सोनवणे यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. बुधवारी (दि.१८) उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत. दुसरा अपघात महामार्गाच्या उड्डाणपूलावरून रस्त्याने पायी जात असतांना झाला होता, या अपघाता बाबात मिळालेली माहिती अशी की, कृष्णकुमार रामजनम चौहाण (२१ रा.उत्तरप्रदेश) हा युवक गेल्या २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आडगाव मेडिकल कॉलेज चौफुली भागात त्यास अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यास रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीड महिने तो मृत्यूशी झुंज देत होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार संजय डापसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पसार झालेल्या वाहनचालकाविरूध्द आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.