नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड लिंकरोड भागातील रामकृष्ण नगर परिसरात जन्मदात्या बापानेच २४ वर्षीय मुलीचा खून केल्याची घटना घडली. ज्योती रामकिशोर भारती असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून वडील व मुलींमध्ये लग्नावरुन वाद सुरु होते. या वादातून ज्योती ही दोन वेळा घरातून निघून गेली होती. काल देखील ज्योती हिने वडील राम किशोरला घरातून निघून जाण्याची धमकी दिली होती. यानंतर वडील रामकिशोर भारती यांना राग अनावर झाल्याने त्यांनी राहत्या घरात तिचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन रामकिशोर भारती यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती अंबड पोलिसांना समजल्यानंतर उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख, उपनिरीक्षक संदीप पवार, उपनिरीक्षक किरण शेवाळे उपनिरीक्षक नाईद शेख आदींसह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर ज्योती हिच्या बापानेच खून केल्याचे समोर आले आहे.