India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी : आज निवडणूक आयोगात नेमकं काय घडलं?

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह नक्की कुणाला मिळणार ठाकरे गटाला की शिंदे गटाला याची उत्सुकता अद्यापही ताणलेलीच राहणार आहे. कारण, आज केंद्रीय निवडणूक आयोगात यासंदर्भात सुनावणी झाली. ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकीलांनी आजच्या सुनावणीत जोरदार युक्तीवाद केला. अखेर आता या प्रकरणी शुक्रवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. आजच्या सुनावणीवेळी ठाकरे गटाच्यावतीने अनिल परब आणि सुभाष देसाई हे नेते उपस्थित होते. गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केले. त्यापाठोपाठ १३ खासदारांनीही शिंदेंना पाठिंबा दर्शविला. शिंदे गटाने अखेर भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे की, तेच खरी शिवसेना आहेत. अखेर हे प्रकरण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. आणि दोन्ही गटांना तात्पुरते दुसरे चिन्ह देण्यात आले आहे. शिवसेनेतील या संघर्षावर आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. आता याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेण्याचे आयोगाने जाहीर केले आहे.

चिन्हाच्या लढाईत पुढची सुनावणी शुक्रवारी, 20 जानेवारी रोजी

मागच्यावेळी ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह,
आज एकनाथ शिंदे यांच्या मुख्य नेता पदावर प्रश्नचिन्ह

जर घटना अवैध आहे असे म्हणतात तर मग हे पद कुठल्या घटनेत आलं असा ठाकरे गटाचा युक्तिवाद

— Prashant Kadam (@_prashantkadam) January 17, 2023

Shivsena Symbol Election Commission Hearing Politics


Previous Post

नाशकातील धक्कादायक घटना! जन्मदात्या बापानेच घेतला २४ वर्षीय लेकीचा जीव

Next Post

मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा : मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये येणार या कंपन्या आणि एवढी गुंतवणूक

Next Post

मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा : मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये येणार या कंपन्या आणि एवढी गुंतवणूक

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group