नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील हिंगवणे येथून घरासमोर पार्क केलेला ५० लाखाचा बाराचाकी हायवा वाहन चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. या चोरीप्रकरणी संतोष सुरेश धात्रक यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धात्रक यांच्या मालकिचा सुमारे ५० लाखाचा बाराचाकी हायवा एमएच १५ एचएच ९९०२ बुधवारी (दि.११) त्यांच्या घर परिसरात रस्त्यावर पार्क केलेला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी हायवा पळवून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत. शहरात दुचाकी, चारचाकी वाहने चोरीला जात असल्याच्या घटना रोजच घडत असतात. पण, आता चोरट्यांनी किंमती वाहनाना लक्ष्य केले असून त्यात १२ चाकी वाहन चोरुन नेले आहे. या वाहनाची किंमत जास्त असून ती चोरुन नेणे सोपे नसतांना चोरट्यांनी थेट घराच्या परिसरातून ही चोरी केली.