नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपनगर नाका भागात एका मसाज सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात देहविक्री होत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत दोघांना पोलिसांनी गजाआड केले असून तीन परप्रांतीय महिलांची सुटका केली आहे. या महिला उत्तर प्रदेश आणि आसाम येथील आहे. या घटनेत सुभाष केदारे व सागर माने मसाज सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेने ही कारवाई केली. संशयितांना उपनगर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून, याप्रकरणी पीडित महिलांना बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्या प्रकरणी व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ.आंचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक माणिक गायकर,नितीन फुलपगार,अभिजीत पवार,दत्तात्रेय कडनोर,जमादार शंकर गोसावी,सुनिल भालेराव,हवालदार दिलीप ढुमणे,श्रीराम सपकाळ,शेरखान पठाण,किशोर देसले,बाळू बागुल,संजय गामणे,समिर चंद्रमोरे,दीपक पाटील, पोलिस नाईक गणेश वाघ,संदिप पवार,सरिता सातपुते,प्रिती कातकाडे,निलीमा निकम,शिपाई युवराज कानमहाले,अतुल पाटील, प्रजित ठाकूर,वैशाली घरटे आदींच्या पथकाने केली.
असा टाकला छापा
जयभवानी रोड भागातील टिव्हीएस शोरूम समोर असलेल्या प्रियदर्शनी व्हिला गेस्ट रूममध्ये बेकायदा देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना गुरूवारी मिळाली होती. त्यानंतर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी छापा टाकला असता देहविक्रीचा प्रकार समोर आला.