नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रीरामपूर येथून गाडीची काच फोडून ६ लाख ४२ हजार रुपये चोरणा-यांना उपनगर पोलीसांनी गजाआड केले आहेत. श्रीरामपूर येथील नितु ढाबा येथून चारचाकी वाहनाची मागील काच फोडून गाडीतील ही रक्कम चोरल्याचे कबुली या चोरट्यांनी दिली आहे. श्रीरामपुर पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार मुक्तीधाम परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना एक बिना नंबर प्लेटची लाल काळ्या रंगाची पल्सर मोसा दिसली. त्यांनी या गाडीवर असलेल्या लखन बाळु पवार, निफाड, श्रीनिवास अशोक बोरजे रा. पिंपळगाव जलाल, ता. येवला, गौरव राजु पवार रा. कुंदेवाडी, ता. निफाड यांना पोलीसांनी थाबविण्याचा इशारा केला. त्यानंतर हे तिघे पळून जाऊ लागले. पोलिसांनी यांचा त्वरित पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे त्यांच नाव गाव पत्ता याच्या बाबत विचारपुस केली असता ते उडवा उडवीचे उत्तरे देवु लागली. त्यांना पॉलिसी खक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ चंद्रकांत खांडवी, सहा. पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग, डॉ. सिध्देश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर, पोलिस निरीक्षक विजय पगारे, पोलिस निरीक्षक पकंज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक विकास लोंढे, संजय ताजणे, विनोद लखन, सुरज गवळी, पकंज कर्पे, राहुल जगताप,संदेश रघतवान यांनी केली आहे.