नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाखाच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घरफोडीप्रकरणी गंगापूर आणि भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना जुने नाशिक येथील काझीगढी भागात घडली. छाया ओमप्रकाश सोनार (रा.शितळादेवी मंदिराजवळ,काझीगढी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनार कुटुंबिय सोमवारी (दि.२) दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीत व कोठ्यांमध्ये ठेवलेली रोकड,सोनसाखळी व मोबाईल असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत. दुसरी घटना गंगापूररोड भागात घडली. संदिप निवृत्ती गिते (रा.अतुल अपा.नवरचना स्कूल मते नर्सरीरोड,सावरकरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गिते कुटुंबिय ३१ डिसेंबर निमित्त बाहेर गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गिते याच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले सुमारे ९६ हजार २०० रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. त्यात मंगळसुत्र आणि कानातील टॉप्सचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.