नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चेतनानगर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमोल मंगेश नलावडे (रा.दैनिका अपा.आव्हाड चौक चेतनानगर) असे म्रुत युवकाचे नाव आहे. नलावडे यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात म्रुत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल याने बुधवारी घरात कुणी नसताना अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॅालमध्ये पंख्याच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत योगेश करंदीकर यानी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.