India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी विधानसभेत गोंधळ; कामकाज तहकूब, अखेर फडणवीसांनी केली ही मोठी घोषणा

India Darpan by India Darpan
December 22, 2022
in मुख्य बातमी
0

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप तसेच शिंदे गटाच्या आमदारांनी आज विधानसभेत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, हा मुद्दा जोरदार लावून धरला. तर, याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली असून त्यात दिशाचा मृत्यू तोल जाऊन पडल्याने झाल्याचे म्हटले आहे. विनाकारण सभागृहाचा वेळ घालवला जात असल्याचे सांगत विरोधकांनी आगपाखड केली. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्याने सभागृह अनेक वेळा तहकूब करावे लागले. अखेर याप्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतरही विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी .युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती सीबीआयने काढला, असे महाविकास आघाडीच्या आमदारांनी सांगितले. मात्र पुन्हा एकदा या प्रकारणावरून पुन्हा एकदा नव्याने वाद उफाळून आला.

कोण आहे दिशा सालियान
दिशा सालियान (वय २८) हिने दि. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असे सांगितले जात होते. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर ६ दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता.
भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली. त्यानंतर इतर सदस्यांनी साटम यांची ही मागणी उचलून धरली. भाजपच्या महिला आमदारांनीही या प्रकरणाचं सत्य बाहेर आलेच पाहिजे, अशी मागणी केली.

शिंदे गटाचे गोगावले म्हणाले
नागपूर विधानसभेत आज पुन्हा, दिशा सालिअनचा संशयास्पद मृत्यू होणे, तिने आत्महत्या केली की तिचा हत्या झाली याबाबत पोलिसांनी माहिती दिली नाही. सुशांतसिंग मृत्यूप्रकरणात सीबीआयने अद्यापही अहवाल न दिल्याने या मृत्यूचे गुढ उकलले नाहीत. त्यामुळे दिशा आणि सुशांतसिंगच्या मृत्यूत काहीतरी साम्य असल्यावरून शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी हा मुद्दा छेडताच सभागृहात गोंधळ निर्माण झाला.

नितेश राणे आक्रमक
भाजपा आमदार नितेश राणेंनीही हे प्रकरण सभागृहात लावून धरले. यावरून असंख्य प्रश्न त्यांनी उपस्थित केले. दिशाच्या मृत्यूवेळी कोण उपस्थित होते? कोणत्या राजकीय दबावाखाली हे प्रकरण बंद करण्यात आले? दिशाची केस सीबीआयकडे नसून मुंबई पोलिसांकडून असून तिच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेज का गायब करण्यात आले? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. इतकेच नव्हे तर तिथे त्या रात्री कोणता मंत्री होता? असे सवाल राणेंनी उपस्थित केले. त्यानंतर अनेक सदस्य पिठासीन अधिकाऱ्यांसमोर येऊन उभे राहिले. अखेर सभागृह तहकूब करण्यात आले. तहकुबीनंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा सेना-भाजपा आमदारांनी व्हेलमध्ये घोषणाबाजी केली. त्यामुळे पिठासीन अधिकाऱ्यांनी पुन्हा कामकाज तहकूब केले आहे.

अजित पवार म्हणाले.. सीबीआयवर विश्वास नाही का
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिशा सालियन प्रकरणी स्पष्ट केले की, दिशा सालियन प्रकरण झाले त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे गेले. सीबीआयने तपास केला आणि दिशाने आत्महत्या केली नाही. तिच्या मृत्यूमध्ये कुणाचाही संबंध नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले. जे प्रकरण संपले आहे तरी ते पुन्हा खुसपट काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातो आहे. यांचा सीबीआयवर विश्वास नाही का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. मात्र आता हे प्रकरण नेमके काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अखेर फडणवीसांची घोषणा
सत्ताधारी आमदारांनी दिशा सालियान मृत्यूप्रकरणी प्रचंड गदारोळ केल्याने अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येईल.

SIT enquiry will be done in #DishaSalian case.
No CBI enquiry is done in this matter.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करण्यात येईल !
या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालेली नाही. कोणताही राजकीय आकस न बाळगता ही चौकशी करण्यात येईल.
(विधानसभा । दि. 22 डिसेंबर 2022) pic.twitter.com/h0Okil3Slx

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 22, 2022

Disha Salian Death Case Assembly MLA
Maharashtra Winter Assembly Session Nagpur Aditya Thackeray


Previous Post

चेतनानगर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणाची आत्महत्या

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत सरकारने दिली ही स्पष्टोक्ती

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत सरकारने दिली ही स्पष्टोक्ती

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group