नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकाली पोलिसांनी वेगवेगळ्या वेशभूषा धारण करुन चोरीच्या २० दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलीसांच्या गुन्हे शोध व पोलिस उपायुक्त परिमंडळ १ यांनी स्थापन केलेले अँण्टी मोटारसायकल थेप्ट पथकाने ही कारवाई केली. संशयित हेमंत रमेश सोनवणे (वय ३५ रा. फोपीर पावडदेव फाटा ता सटाणा जि नाशिक) याच्याकडून ८ लाख ५ हजारांच्या १६ दुचाकी चोरीची ताब्यात घेण्यात आल्या आहेत. भद्रकाली हद्दीत ७ गुन्हे व सटाणा येथील १ उघडकीस आले आहेत. सदर कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे किशोर खांडवी, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, लक्षमण ठेपणे, रमेश कोळी, संदिप शेळके आदीच्या पथकाने केली. दुसरी कारवाई परिमंडळ १ अँण्टी मोटारसायकल थेप्ट पथकांने एनडी पटेलरोड एसटी महामंडळाच्या कार्यालय समोरुन संशयित हबीब हनिफ शहा ( वय २३ रा. भखरत नगर) यास पथकाने ताब्यात घेतले असता. पंचवटी २ व सरकार वाडा हद्दीतील ४ चोरी केलेल्या चार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सदर कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत सोनवणे, पोलिस नाईक प्रभाकर सोनवणे, पोलिस शिपाई संतोष पवार, अनिल आव्हाड, इरफान शेख, विश्वजीत राणे आदीच्या पथकाने केली.