बांधकाम साईटवरून ७२ हजार ५०० रूपयाच्या सेट्रींग प्लेटा चोरीला
नाशिक : बांधकाम साईटवरून चोरट्यांनी सुमारे ७२ हजार ५०० रूपये किमतीच्या सेट्रींग प्लेटा चोरून नेल्या. ही चोरी खांदवे नगर येथील सोमेश्वर कॉलनी भागात सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर झाली. शैलेश सोमाजी छाबीया (रा.हिरावाडी)यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाबीया यांचे सोमेश्वर कॉलनीतील गुरू गणेश हाईटस या बांधकाम सुरू असलेल्या साईटवर काम सुरू आहे. या साईटवरील वॉचमन रूममध्ये ठेवलेल्या सुमारे ७२ हजार ५०० रूपये किमतीच्या सेट्रींग प्लेटा चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना ही घटना शुक्रवारी (दि.८)रात्री घडली. अधिक तपास पोलिस नाईक कोरडे करीत आहेत.
खुर्चीवरून पडल्याने वृध्देचा मृत्यू
नाशिक : महात्मानगर भागात टीव्ही बघत असतांना अचानक खुर्चीवरून पडल्याने ८० वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. कमल दौलत पवार (रा.मनिषा बंगला,महात्मानगर) असे मृत वृध्देचे नाव आहे. पवार या शुक्रवारी (दि.८) रात्री आपल्या घरात खुर्चीवर बसून टिव्ही बघत असताना अचानक तोल जावून पडल्या होत्या. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने मुलगा मनिष पवार यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या कासलीवाल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत.