नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोड भागात गप्पा मारत उभ्या असलेल्या दोघा मित्रांना दमादाटी करीत दुचाकीस्वारांनी मोबाईल हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल अनिल तेजाळे (रा.शिवाजीरोड शालिमार) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. तेजाळे व अंकुश कोतवाल हे दोघे मित्र शुक्रवारी (दि.१६) दिंडोरीरोडवरील हॉटेल महाराज शेजारी गप्पा मारत असतांना ही घटना घडली. शाईन दुचाकीवर आलेल्या त्रिकुटाने दोघांना दमदाटी करीत त्यांच्या खिशातील सुमारे तीस हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.