नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत जावयाच्या मोटारसायकलवर बसत असतांना तोल जावून पडल्याने जखमी झालेल्या ७० वर्षीय वृध्द सासूचा मृत्यू झाला. शोभावती दुधनाथ यती (७० रा.भाग्यश्री मेडिकल जवळ,दत्तनगर अंबड) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे. यती यांच्यावर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शोभावती या गेल्या शुक्रवारी (दि.२) रात्री जावई सत्यप्रकाश सुरत गिरी यांच्या दुचाकीवर बसत असतांना ही घटना घडली होती. दुचाकीवर बसत असतांना अचानक मागे तोल गेल्याने त्या जमिनीवर पडल्या होत्या. या घटनेत त्यांच्या कमरेस आणि पायास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.