नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – फुलेनगर भागात आर्थिक वादातून एकावर दोघांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत ३६ वर्षीय युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी याप्रकरणी समाधान मुरलीधर गायकवाड (३६ रा.शिवलिला सोसा.म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल मुसळे आणि शुभम मुसळे (रा.दोघे दत्तनगर,फुलेनगर) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. गायकवाड बुधवारी (दि.१४) दत्तनगर भागात राहूल बोडे यांच्या कुट्टी मशिनवर काम करीत असतांना ही घटना घडली. गायकवाड यांचे वडिल आणि संशयितामध्ये आर्थिक व्यवहार आहेत. समाधान गायकवाड यांनी वडिलांकडून घेतलेल्या पैश्यांची संशयिताकडे विचारपूस केली असता संतप्त दोघांनी त्यास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. यावेळी झालेल्या झटापटीमुळे विशाल मुसळे या संशयिताने कुट्टी मशिनजवळ पडलेले धारदार शस्त्र उचलून गायकवाड याच्या पोटावर वार केले. या घटनेत गायकवाड जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस नाईक सानप करीत आहेत.