मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोन्याला मोठी झळाळी आली आहे. त्यामुळेच सोन्याचा दर तब्बल २८ महिन्यांनंतर ५४ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचला आहे. नव्या वर्षात सोन्यात मोठी तेजी दिसण्याचा अंदाज आहे. सोन्याचे दर तोळ्याला तब्बल ६४ हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे भाकित तज्ज्ञांनी वर्तवले आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. आणि आता सोन्याचे दर वाढणार असल्याने सद्यस्थितीत सोन्याची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत.
सोने खरेदीला अनेकांचे प्रथम प्राधान्य असतं. शेअर बाजारात पडझड होत असते त्यावेळीही लोकांचा सोने खरेदीकडे कल असतो. याशिवाय लग्नाचा हंगाम असल्यामुळे सध्या सोन्याची मागणीही वाढली आहे. आता मात्र, खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे. आता सोहळे आणि उत्सव यामुळे सोन्याची मागणी जास्त असेल. दिवाळीत सोने साहजिकच मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जाईल. यात प्लेन गोल्ड खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाईल. जगभरातील खाणींमधून वर्षाला ३ हजार टन सोने काढले जाते. कच्चा तेलाच्या किमती जशा वाढतील तशा सोन्याच्या किमती वाढतात. काही कंपन्या कच्चे तेल खरेदी करतात आणि मोबदल्यात सोने देतात. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होते.
पाच वर्षात सोन्याचा दर दुपटीवर
आज सोन्यामध्ये ज्वेलरीस अधिक मागणी आहे. मोती, कुंदन असे यात प्रकार आहेत. काही ग्राहक प्लेन गोल्ड खरेदी करत आहेत. याचे कारण म्हणजे सोने जेवढे साधे तेवढी लेबर कॉस्ट कमी असते. म्हणजे एका अर्थाने गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. आता सरकारची जी हॉल मार्किंगची पॉलिसी आली आहे; त्यामुळे सोन्याचे रिटर्न पूर्ण मिळत आहेत. येत्या पाच वर्षांत सोने दुप्पट होईल. म्हणजे सोन्याचा भाव एक लाख होईल असा अंदाजदेखील तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
Investment Gold Rates Hike Expert New Year