नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडकोतील रायगड चौकात चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दुकानदाराने दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. मुलगी सशयिताच्या दुकानात पेन घेण्यासाठी गेली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नंदलाल वंजी वाणी (रा.रायगडचौक सिडको) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. संशयिताचे परिसरात स्टेशनरीचे दुकान आहे. मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास मुलगी संशयिताच्या दुकानात पेन खरेदी करण्यासाठी गेली असता ही घटना घडली. संशयिताने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दुकानात घेतले यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.