नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– थत्तेनगर भागात महापालिकेच्या जुने पंपीग स्टेशन भागातून चोरट्यांनी लहान मोठे पाईप चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे १९ हजाराच्या लोखंडी सामानावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मनोहर पाटेकर (रा.आकाशवाणी टावर जवळ,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. पाटेकर यांच्याकडे मनपाच्या पंपीगस्टेशन देखरेखीची जबाबदारी आहे. गेल्या १ सप्टेबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान चोरट्यांनी ही चोरी केली. थत्तेनगर येथील जुने पंपीग स्टेशन आवारात पडलेले मोठ्या पाईपांना जोडण्यासाठी लागणारे लोखंडी कॉलर, लहान मोठे वॉल, टी आकाराचे लहान मोठे लोखंडी पाईप,एलबो आणि लोखंडी सळई असा सुमारे १९ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. अधिक तपास उपनिरीक्षक मोतीलाल पाटील करीत आहेत.