शिलापूर शिवारात रेल्वेच्या बांधकाम साईट वरून साहित्य चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिलापूर शिवारात रेल्वेच्या बांधकाम साईट वरून चोरट्यांनी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. त्यात लोखंडी रिंगाचा समावेश असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लविशंकात मनिकांत शर्मा (रा.कलानगर जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिलापूर शिवारात रेल्वे प्रकल्पाच्या सबवे वर्कचे काम सुरू आहे. गेट नं.२ येथे सुरू असलेल्या बांधकामावरून चोरट्यांनी सव्वा दोन फुट लांबीच्या व ८० किलो वजनाच्या सुमारे ५ हजार ६०० रूपये किमतीच्या लोखंडी प्लेटा चोरून नेल्या ही घटना गेल्या सोमवारी (दि. १२) रोजी घडली. अधिक तपास जमादार वाढवणे करीत आहेत.
३३ वर्षीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३३ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना जेलरोड भागात घडली. योगेश तुकाराम मौले (रा.श्रध्दा रो हाऊस,कॅनोल रोड जेलरोड) असे मृत युवकाचे नाव आहे. योगेशच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश मौले याने सोमवारी (दि.१२) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत भाऊ विठ्ठल मौले यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कुºहाडे करीत आहेत.