नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागातून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहे. याप्रकरणी भद्रकाली,अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना अंबडगावात घडली. पाथर्डी फाटा येथील मनोहर मुरलीधर पाटील (रा.सिध्दीविनायक संकुल,ज्ञानेश्वरनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील गेल्या २२ नोव्हेंबर रोजी अंबड गावात गेले होते. भाजीपाला मार्केट भागात त्यांनी आपली अॅक्टीव्हा एमएच १५ एचटी ४०३४ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक गोसावी करीत आहेत. दुसरी घटना मेनरोड भागात घडली. सातपूर येथील दर्शन नरेंद्र वाळुंजे (रा.सावरकरनगर,अशोकनगर) हे रविवारी (दि.११) मेनरोड भागात गेले होते. आरती डिस्ट्रीब्युटर्स येथील विश्राम बाग येथे त्यांनी आपली अॅक्टीव्हा एमएच १५ ईयू ७७७५ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक आहेर करीत आहेत. तर तिसरी घटना नाशिकरोड रेल्वे परिसरात घडली. सागर काळू जाधव (रा.शिवाजीवाडी,वडाळा पाथर्डीरोड) हे गेल्या शनिवारी (दि.१०) नाशिकरोड रेल्वेस्थानक भागात गेले होते. बसस्टॅण्ड आवारात त्यांनी आपली शाईन मोटारसायकल एमएच १५ जीएन ९०७१ पार्क केली असता ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.