नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबादरोडवरील शांतीनगर भागात देवदर्शन करून घराकडे परणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक सदाशिव सोनवणे (रा.महालक्ष्मीनगर,नेवा हॉस्पिटल जवळ,म.बादरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे यांच्या आई विमल सोनवणे या रविवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या शांतीनगर येथील रोड क्रॉस करून नेवा हॉस्पिटल समोरून कॉलनीरोडने पायी जात असतांना ही घटना घडली. समोरून पांढºया रंगाच्या मोपेड दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ््यातील सुमारे ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत.