नाशिक : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना उंटवाडी परिसरात घडली आहे. उंटवाडी येथील बालकल्याण समिती कार्यालयातून सदर मुलगी पसार झाली असून तिला कुणी तरी फुस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या गुरूवारी दुपारच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलीस उंटवाडी येथील बालकल्याण समिती कार्यालयात येथे हजर करण्यासाठी आल्या होत्या. कार्यालयीन रजिस्टरमध्ये नोंद करण्यासाठी महिला गेली असता मुलगी नजर चुकवून पळून गेली. या मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज बांधला जात असून, अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.